जळगावसामाजिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण अप्पा खडके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. नारायण अप्पा खडके यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व कर्मचारीवृंद, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी शिक्षक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच खडके परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी प्रा. डॉ. नारायण अप्पा खडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

या आनंदोत्सवाचे औचित्य साधून सद्गुरु परिवार, मित्रपरिवार आणि खडके परिवाराच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जळगाव शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून अप्पासाहेबांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला सद्गुरु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकवृंद तसेच सद्गुरु शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button