
जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आयोजित ‘हिरवांकुर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव–२०२६’ अंतर्गत भरविण्यात आलेल्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाला श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुणच्या १०० विद्यार्थ्यांनी आणि २५ शिक्षकांनी भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.
प्रदर्शनामध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, निसर्गरक्षण, हरित शहराची संकल्पना आदी विषयांवरील विविध उपक्रम व माहितीपर मांडणी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने पाहिली. प्रत्यक्ष प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती मिळाली.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील माहिती न देता प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरणाची जाण निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रदर्शनाला नेण्यात आले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थी व २५ शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी कुतूहल आणि जाणीव निर्माण झाली.






