जळगावसामाजिक

देशात संविधान विरोधी ताकत सातत्याने वाढत आहे : जयसिंग वाघ

रावेर :- भारताला संविधान लागू होऊन ७५ वर्षे झाली , या ७५ वर्षात आपल्या संविधानानुसार एकिकड देशाचा राज्य कारभार चालविला गेला , मात्र त्याच बरोबर संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवून , तिच्या समोर नवनवे आव्हाने उभे करून तिच्या विरोधात जनमत घडविण्याचे प्रयत्न सातत्याने होत गेल्याने देशात संविधान विरोधी ताकत वाढत आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

रावेर तालुक्यातील खिर्डी येथील बुद्ध विहारात पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आव्हाने आणि उपाय या विषयावर आयोजित प्रशिक्षण शिबिरात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

जयसिंग वाघ यांनी अलीकड न्यायाधीश लोकांचे वक्तव्य , त्यांनी दिलेले निर्णय , त्यांच्याकडं मिळणारी अमाप संपत्ती पाहता देशात न्यायाधीश सुध्दा राजकारणी लोकांसारखे वागत असल्याचे दिसत आहे . देशातील राजकारणी लोकं अलीकड धार्मिक होवून ते धर्माचा अजेंडा राबविताना दिसतात , सरकारचा कोणताच धर्म नसताना सरकार एकाच धर्माचा शासकीय पातळीवर प्रचार , प्रसार करत आहे . धर्मा धर्मात द्वेष पसरविला जात आहे , अन्य धर्मीयांच्या पुजास्थळावर ताबा मिळविण्याचा प्रकार वाढत आहे या सर्व बाबी पुढं अश्याच चालू राहिल्या तर लोकांचा संविधानावरील विश्वास उडून जाईल असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छ. शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जाधव होते . त्यांनी आपल्या भाषणात आरक्षण , खाजगीकरण , जनसुरक्षा अधिनियम या बाबतची माहिती दिली . संविधानातील विविध कलमांचे स्पष्टीकरण देऊन त्याचे महत्व सांगितले तसेच संविधानात नमूद मूलभूत तत्वे आज प्रत्यक्षात आणली जात नसल्याने जनता रस्त्यावर येऊन आपले हक्क मागत आहे असे सांगितले .

या प्रसंगी संघटक राजेंद्र तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती करिता घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली . जिल्हा प्रभारी रमेश साळवे यांनी राज्यघटना बदलाविण्या बाबत येणारी विविध वक्तव्ये पाहता शासनाची त्यास मूकसंमती दिसून येत असल्याचे मत मांडले .  विनोद कोचुरे , विजय सपकाळे , सिद्धार्थ गाढे , अनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश साळवे यांनी तर आभारप्रदर्शन हुकुमचंद जुहुरे यांनी केले . अविनाश बोदडे , किरण कोचुरे , अंकुश कोचुरे , अशोक कोचुरे , नरेंद्र वाघोरे , लक्ष्मण इंगळे , विनोद कोचुरे, सतिष कोचुरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button