शैक्षणिकजळगाव

सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दुपारी २.०० वाजता सुरू झाली.

ही कार्यशाळा एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. साहेबराव भुकन (अधिष्ठाता, शिक्षणशास्त्र आंतरविद्या शाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात घ्यावयाच्या काळजीविषयी तसेच परीक्षेच्या वेळेस पाळावयाच्या सूचनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, वरिष्ठ आणि कनिष्ठ परीक्षक म्हणून प्राध्यापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांसह महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे, सद्गुरु शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत शिंपी तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सुवर्णा अहिरे, निधी शर्मा, डॉ. तुळशीराम खडके, प्रा. राजेंद्र भालोदकर, श्री. पंकज वाघ, श्री. अरविंद पवार आणि श्री. चंद्रकांत सपकाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अनिता वानखेडे यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके यांनी परवानगी दिली, त्याबद्दल डॉ. अनिता वानखेडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच, या कार्यशाळेस सहकार्य करणाऱ्या सर्वांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button