

जळगाव, (दि. 17 एप्रिल ): जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या सन्माननीय खासदार सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने केलेल्या द्वेषमूलक कारवाईच्या विरोधात होते.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय दूरसंचार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, शहर सरचिटणीस दीपक सोनवणे, सेवा दलाचे राज्य पदाधिकारी राजस कोतवाल, सरचिटणीस राहुल भालेराव, शहर उपाध्यक्ष जाकिर बागवान, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पटेल, युवक काँग्रेस मास्टर ट्रेनर मुक्तदिर देशमुख, शहर प्रवक्ते शफी बागवान, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष अण्णा जाधव, रवींद्र चौधरी, सचिव सागर सपके, किरण अडकमोल, महिला पदाधिकारी मीरा सोनवणे, मीनाक्षी जावळे, छाया कोरडे, अर्चना गाडे, रिक्षा युनियन अध्यक्ष कैलास सोनवणे, ताराचंद पाटील, प्रदीप पाटील, नारायण सोनवणे, सचिन जाधव, महाजन काका आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात काँग्रेसने केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करत लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरुच राहील असा निर्धार व्यक्त केला.




