जळगावसामाजिक

महाबोधी महावीहार आंदोलनात जळगावकर आंदोलनाच्या माध्यमातून सहभागी:- बाबुराव वाघ

जळगाव – जळगाव येथून महाबोधी महाविहार येथे एक दिवसीय आंदोलनासाठी जळगावची टीम दि.23 एप्रिल रोजी सहभागी झाली. 17 लोकांची ही टीम गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच आंदोलन कर्ते पुज्यनिय भिक्खू संघ यांना प्रत्यक्ष भेटून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भात निवेदन सादर केले आणि एक दिवसाचे पूज्य भंतेजींच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे. त्यामध्ये माननीय बाबुराव वाघ जयसिंग वाघ, राजूभाई मोरे,आनंद कोचुरे, सत्यजित साळवे, दिलीप तासखेडेकर, चंद्रशेखर अहिरराव, उदय सपकाळे, अशोक सैंदाणे, सीयू भालेराव, शरद भालेराव,डी झेड मोरे, हरिश्चंद्र सोनवणे, सर नथ्थू अहिरे, रामभाऊ शिरसाठ, सुभाष वाघ अशी टीम जळगाव रेल्वे स्टेशन वरून रवाना झालेली आहे उद्देश एकच आहे की महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात मिळावा त्यात जळगाव करांचाही काही ना काही सहभाग त्या आंदोलनात राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button