जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली

जळगाव – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य व शाळेतील शिक्षक पालक, विद्यार्थी यांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला. महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन केल्यानंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ , ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ असे नारे देण्यात आले.हातात फलक घेऊन आणि दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात घोषणा देत, बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button