

जळगाव : माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार भारतीय सैनिकांनी पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच केलेल्या युद्धात गाजवलेल्या शौर्याचे अभिनंदन करण्यासाठी व या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी साठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर रॅलीची सुरुवात तांबापुरा येथील शहीद हमीद चौकापासुन स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत तायडे यांच्या हस्ते झाले. तांबापुरा येथील प्रमुख मार्गांवरून फिरत शिरसोली रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन करून तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी शहर उपाध्यक्ष जाकिर बागवान, शहर प्रवक्ते शफी बागवान, बाबा देशमुख, महिला शहराध्यक्ष मीराताई सोनवणे, छायाताई कोरडे, मीनाक्षीताई जावळे, माया सुरवाडे यांच्यासह अण्णा जाधव, रवींद्र चौधरी, गोकुळ चव्हाण, विठ्ठल सोनवणे, रतन सोनवणे, किरण अडकमोल, प्रियंका सुरवाडे, सिद्धांत तायडे, पियुष तायडे, जतिन बोरसे आणि इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या यात्रेत स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांनी वातावरण देशप्रेमाने भारून टाकले होते.




