

जळगाव, दि. 14 ऑगस्ट 2025 – ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात तिरंगासह सेल्फी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगितले. तसेच तिरंगासह सेल्फी काढून तो ऑनलाईन कसा अपलोड करावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. नारायण खडके उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, सहाय्यक प्राध्यापक सुवर्णा अहिरे, निधी शर्मा, ग्रंथपाल पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, चंद्रकांत सपकाळे तसेच शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील डॉ. जयवंत शिंपी, डॉ. तुळशीराम खडके व प्रा. राजेंद्र भालोदकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. नारायण खडके यांनी परवानगी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापकवृंद व द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थी-शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.




