

जळगाव – जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पशु धनात लंपी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पोळा घरगुती पद्धतीने साजरा करा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जनतेला केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद देत मेहरुण गावातील शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त तीन ते चार बैलांना सजवून पोळा साजरा केला. मेहरूण गावामध्ये दरवर्षी पोळा साजरा करण्याची पद्धत आहे. मेहरूण मधील चौकात दोघं झाडांना दोर बांधून त्यावर नारळ बांधले जातात व संपूर्ण परिसरातील शेतकरी त्यांचे बैल जोड्या घेऊन तिथे उपस्थित राहतात, हि पद्धत आजही सुरू ठेवलेली आहे. यासाठी माजी नगरसेवक प्रशांत नाईक हे प्रत्येक वर्षी पुढाकार घेऊन बैलपोळा साजरा करीत असतात गावातील शेकडो शेतकरी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवत असतात या वर्षी सुद्धा प्रशासनाच्या नियमाचे पालन करून मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा साजरा करण्यात आला.




