

जळगाव – दि. २५ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी श्री. चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चिंचोली यांच्या वतीने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे औचित्य महाविद्यालयाचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील यांची पत्नी व संस्थेचे सचिव राहुल पाटील यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, कुसुंबा येथील ५० विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बसने चिंचोली येथे आणण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करून त्यांना होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी पुढील काही दिवसांत केली जाणार असून ज्या विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळतील त्यांना संस्थेमार्फत मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे.


शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे यांनी केली. आरोग्य तपासणीचे कार्य डॉ. अमिता श्रीवास्तव व डॉ. हर्षा मुलांडे यांनी पार पाडले. तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स प्राची खलसे, श्रद्धा चौधरी व फैज खान यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी व होमिओपॅथी औषधोपचाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला जि. प. शाळा कुसुंबा येथील शिक्षिका सुनीता भोळे व सोनाली मॅडम उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. पी. ई. तात्या पाटील, त्यांची पत्नी सौ. निर्मलाताई पाटील हे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सौ. निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे नियोजन झाले. याप्रसंगी प्रा. डॉ. संदीप गुरचर, श्री. अजय पाटील, चंद्रकांत पाटील, इरफान शेख यांसह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.




