

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे ४ रोजी, गुरुवारी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक तसेच विद्यार्थी शिक्षिका तरन्नूम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शिक्षक दिन या कार्यक्रमाची रुपरेषा इयत्ता नववी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. शिक्षकांची भूमिकादेखील त्यांनी पार पाडली. शिक्षक दिनानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी
आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. त्यानंतर शिक्षकाचे योगदान आणि भूमिका उपशिक्षिका शितल कोळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आणि व शिक्षिका रूपाली आव्हाड यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी शिक्षकाचे महत्व समाजात असलेली शिक्षकाची गरज याविषयी माहिती दिली याप्रसंगी विविध विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत वर्गावर तासिका घेतल्या. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.




