

जळगाव – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरू शिक्षण शास्त्र महाविद्यालयात “एक दिन, एक घंटा, एक साथ” हा उपक्रम दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या. सरस्वतीच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी प्राध्यापक वृंदाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्रा. निधी शर्मा यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान आयोजित “विकसित भारत संवाद” व त्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातील विविध उपक्रमांची माहिती दिली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी पल्लवी पाटील यांनी मनोगतातून श्रमदान ही रोजची सवय व्हावी यावर भर दिला. ज्योती पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, तर सोनाली मोरे यांनी “पर्यावरण स्वच्छ तर आपण सुरक्षित” असा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रतिभा पाटील यांनी जीवनात स्वच्छता व नेटकेपणा गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी शिक्षकांच्या स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांवर प्रभाव टाकतात व विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतात, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता पाटील यांनी केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छतेचे कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. नारायण खडके यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता जावे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, प्रा. जयश्री शिंगाडे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे यांसह द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




