जळगावसामाजिक

बालरत्न फाउंडेशनतर्फे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जळगाव : बालरत्न फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम गिरणा पंपिंग रोड वाघ नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान प्रचारक साक्षरता अभियानाचे ॲड. मुकेश कुरील होते. प्रमुख अतिथी म्हणून बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण, भारत सोनवणे, जिजामाता विद्यालयाचे कला शिक्षक दिनेश सोनवणे, पोलीस दलातील दीपक सपकाळे, सकल मांग गारुडी समाजाचे अध्यक्ष रोहित सकट, निलेश अहिरे, योगेश बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध भाषणे, गीत गायन, नृत्य व संगीत, नाटक यांचे सादरीकरण केले. अनुश्री चौधरी, कावेरी आगळे, विद्या अवचार, मुस्कान खान, यश ढालवाले, दक्ष आगळे, माही बागडे, आर्यन सोनवणे, चैताली बाविस्कर, आहाना सोनवणे व आरोही सोनवणे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

मान्यवरांच्या हस्ते नृत्य, गीत व वक्तृत्व स्पर्धांतील यशस्वी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना दीपक सपकाळे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने शिक्षण घेण्याचे आवाहन केले, तर दिनेश सोनवणे यांनी “प्रत्येकात एक रत्न दडलेले आहे, ते शोधण्यासाठी ज्ञानाची कास धरा,” असा संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात ॲड. मुकेश कुरील यांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या समाजकार्याचे तसेच भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश राखपसरे, उपाध्यक्ष नीलिमा कसबे, राकेश बडोले, नितीन राखपसरे, शुभम मोरे, निलेश मोरे, राहुल नन्नवरे, योगेश राठोड, दीपक देवरे, कृष्णा राठोड, परशुराम नाडे, भूषण इंगळे, प्रतीक आगळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री संतोष सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेश बाळू राखपसरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button