जळगावशैक्षणिक

सशक्त समाज निर्मितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक : डॉ.प्रतिभा निकम.

जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे नुकतेच मूळजी जेठा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रतिभा निकम यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष उपप्राचार्य श्री.आर. बी.ठाकरे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉ. प्रतिभा निकम यांचे स्वामी विवेकानंदांची आकर्षक मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. निकम यांनी ‘विज्ञान : एक प्रगतशील करिअरचे द्वार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बारावीनंतर विज्ञानाच्या उपलब्ध विविध करिअर वाटांविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना स्वतःचा कल आणि छंद तपासून पाहावा. निकोप सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे व आयुष्यात उद्दिष्टे आणि तत्त्वे निश्चित करूनच आपले ध्येय गाठावे, ज्यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने साकारता येतील असे प्रतिपादन केले.

प्रा.श्री.आर.बी.ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम विज्ञानातील बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीने आकलन करावे. यातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिकदृष्टी वाढीस लागेल आणि त्यांना वैज्ञानिक बनण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले . यावेळी पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या.

प्रास्ताविक विज्ञान मंडळ अध्यक्ष प्रा.विनोद वेदकर,सूत्रसंचालन प्रा.धनश्री पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.वीणा भोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.दिनेश महाजन, प्रा.विनोद पावरा, प्रा.स्वप्ना पाटील, प्रा.छाया पाटील, प्रा.वर्षा पाटील, प्रा.निलिमा पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी अजय काळे,विजय जावळे,चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button