

जळगाव – संत ज्ञानेश्वर विद्यालयात एड्स जनजागृतीसाठी “Red Ribbon Club” या उपक्रमाची सुुरुवात उत्साहात करण्यात आली. विद्यालयातील आठवी, नववी आणि दहावीतील विद्यार्थी या क्लबचे सदस्य म्हणून निवडण्यात आले आहेत. या क्लबचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांची निवड करण्यात आली असून क्लबचे समुपदेशक व मार्गदर्शक म्हणून डॉ. उमेश पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी लाल रिबीन लावून जागरूकतेचा संदेश दिला. लाल रिबीन हा एड्स जनजागृती, सहअस्तित्व आणि भेदभावमुक्त समाजाचे प्रतीक असल्याचे विद्यार्थ्यांना समजावण्यात आले. “Red Ribbon Club” च्या माध्यमातून विद्यालयात वर्षभर आरोग्यजागरूकता एड्सविषयी योग्य माहिती भेदभाव निर्मूलन सामाजिक जबाबदारी जनजागृती रॅली, पोस्टर स्पर्धा, समुपदेशन कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.




