जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा मार्गदर्शन

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पायोनियर कॉम्प्युटर चे मार्गदर्शक अतुल चांदेलकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारी संदर्भात मौल्यवान मार्गदर्शन केले. अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन व परीक्षेतील ताणतणाव कसा दूर करावा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास परिवेक्षिका शितल कोळी उपशिक्षिका साधना शिरसाट उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button