जळगावशैक्षणिक

गाडगेबाबा जयंती व स्व. सुरेश मामा नाईक यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव – मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत गुरु तेग बहादुर यांच्या स्मरणार्थ तसेच स्व. सुरेश मामा नाईक यांच्या जयंती निमित्त आणि संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते इयत्ता ३री च्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

याच वेळी माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी वर्गखोल्या, प्रांगण व शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रकट केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन करताना समाजसेवा, स्वच्छता व शिक्षण या तिन्ही गोष्टी जीवनात महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button