जळगावशैक्षणिक

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात होळी व धुलीवंदन उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) – सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दि. ४ मार्च रोजी होळी/धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम व द्वितीय वर्षाचे शिक्षक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे, डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा तसेच ग्रंथपाल श्री. पंकज वाघ यांनी विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग नोंदवला. रंगांच्या उधळणीत आणि आनंदी वातावरणात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा केला.

यावेळी बोलताना डॉ. अनिता वानखेडे यांनी होळीच्या रंगांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही यश, आनंद आणि सकारात्मकतेचे रंग भरावेत, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button