
जळगाव – जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “वस्तू ओळखा” हा माहितीपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध दैनंदिन वापराच्या वस्तू दाखवून त्या वस्तूंवरील MRP, उत्पादन तारीख, मुदत समाप्ती (Expiry Date), वजन, उत्पादक कंपनीचे नाव याची माहिती कशी तपासावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कोणतीही वस्तू खरेदी करताना बिल घेणे, मुदत संपलेली वस्तू टाळणे आणि योग्य माहिती पाहणे किती आवश्यक आहे याबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमात पर्यवेक्षिका शितल कोळी मॅडम यांनी निरीक्षण केले, तर विद्यार्थ्यांना उपक्रमाचे महत्त्व आणि जागरूक ग्राहक होण्याबाबत रूपाली आव्हाड मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन ते भविष्यात जबाबदार नागरिक बनण्यास प्रेरणा मिळते.






