जळगावशैक्षणिक

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिप्राय संकलनाचा अभिनव उपक्रम

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पालक व विद्यार्थ्यांकडून अभिप्राय संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पालक व विद्यार्थ्यांना अभिप्राय फॉर्म देऊन अध्यापन पद्धती, विषय समज, शिक्षक-विद्यार्थी संवाद तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी मते जाणून घेण्यात आली. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपयुक्त सूचना सादर केल्या.
संकलित अभिप्रायाचे शिक्षक बैठकीत विश्लेषण करून अध्यापनात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले तर पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी उपक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
या कार्यक्रमात शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button