जळगावसामाजिक

सारांश फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर संपन्न

पिंप्राळा  : महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सारांश फाउंडेशनच्या वतीने जि. प. कॉलनी, खंडेराव नगर (पिंप्राळा) येथे मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील हरिविठ्ठल नगर व खंडेराव नगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कार्यक्रमास आमदार राजुमामा भोळे, नगरसेवक जाकीर पठाण, अतुल बारी, मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे, सतीश गायकवाड तसेच सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.

यावेळी आमदार राजुमामा भोळे यांनी महापुरुषांची जयंती आरोग्य शिबिराच्या माध्यमातून साजरी करण्याच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी संपूर्ण मानवजातीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत अभिवादन केले.

शिबिरात श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने नेत्रतज्ज्ञ डॉ. जयेश वाल्हे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. स्वाती सोनवणे तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्षा निलू संजय इंगळे,  उपाध्यक्षा इंदु मोरे, सचिव पूजा अजय इंगळे, उपसचिव चंदा सिद्धांत इंगळे तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

तसेच या उपक्रमासाठी श्री चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष पी. ई. तात्या पाटील, सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. सुधांशू सिंग व रुग्णालय अधीक्षक डॉ. नरेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button