जळगावसामाजिक

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे -प्रमोद पाटिल

जळगाव – “एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळणार का?” असा सवाल उपस्थित करत एकल-अविवाहित विकास मंचतर्फे शासनाकडे महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या मंचाचे प्रमोद पाटील यांनी ‘एकल’ (अविवाहित) व्यक्तींसाठी दरमहा मानधन सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

समाजातील विविध घटकांना शासनाकडून आर्थिक व सामाजिक सहाय्य उपलब्ध आहे. अपंग, निराधार, वृद्ध व्यक्तींना मानधन योजना लागू आहेत. तसेच सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घटकांना वेतन, पेन्शन व विविध सवलती मिळतात. मात्र, अविवाहित आणि एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी कोणतीही ठोस योजना नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.

प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे की, “एकल जीवन जगणाऱ्या व्यक्ती समाजासाठी अनेकदा सामाजिक जाणिवेतून योगदान देतात. तरीही त्यांच्या मूलभूत गरजा, सुरक्षितता, रोजगार, आरोग्य व निवारा या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शासनाने कोणताही निकष न लावता दरमहा मानधन योजना सुरू करावी.”

हल्लीच्या काळात अनेक स्त्री-पुरुष विविध कारणांमुळे अविवाहित किंवा एकटे जीवन जगत आहेत. अशा व्यक्तींसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार व निवारा यासह सामाजिक आधार देणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अशा व्यक्तींसाठी ठिकठिकाणी सेवा प्रकल्प, “आपुलकी सेवा केंद्र” यांसारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच समाजातील सामाजिक संस्था, कॉर्पोरेट समूह, देणगीदार व समाजसेवकांनी पुढे येऊन या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन करण्यात आले.

या संदर्भात अधिक माहिती किंवा सहकार्यासाठी एकल-अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील (मो. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button