जळगावसामाजिक

वाढदिवसानिमित्त होणार ज्येष्ठांचा सन्मान; श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघाच्या अभिनव उपक्रमात पाच ज्येष्ठांचा गौरव

जळगाव : श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघ, मेहरूण यांच्या वतीने मेहरूण गाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत दुसरा कार्यक्रम आज मेहरूण येथील साईबाबा मंदिर परिसरात उत्साहात पार पडला.

यावेळी वसंत आनंदा पाटील, अशोक शामराव वंजारी, शोभाबाई वंजारी, कल्पनाबाई ढाकणे आणि वासुदेव विठ्ठल सानप या पाच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहरूण परिसरातील माजी नगरसेवक प्रशांत नाईक हे होते. तर माजी नगरसेवक अशोक सिताराम लाडवंजारी व सुनील वसंत वंजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिलीप पुंडलिक लाडवंजारी, उपाध्यक्ष सोमनाथ सानप यांच्यासह रवींद्र सानप, उत्तमराव नेरकर, दत्तात्रय लाड, विनोद पाटील, भास्कर वंजारी, निवृत्ती महाजन, रवींद्र तायडे, अनिल महाजन, सुनील भालेराव, बाबुराव वाघ, गोविंदा वाघ, भास्कर महाजन, पुष्पाताई घुगे, भास्कर वाणी, अनिल चाटे, गजानन लाडवंजारी, अमर लाडवंजारी, नितीन चाटे, रघुनाथ कोल्हटकर, नारायण वाघ आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button