जळगावशैक्षणिक

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

जळगाव दि.४ : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा जोपासणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील भार्गवी रुपेश पवार, काव्या शामकांत पाटील, विद्या विनोद बागुल या वि‌द्यार्थिनी शहरी सर्वसाधारण गटाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले. या विद्यार्थिनींना राजेंद्र बावस्कर, चित्रलेखा अत्तरदे, वंदना मारकड, गीतांजली काळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासावर विशेष भर दिला जातो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने वि‌द्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव परीक्षा, विविध प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तसेच वैयक्तिक शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. वि‌द्यार्थिनींनी नियमित व नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा प्रभावी उपयोग करून हे उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थिनींची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि वि‌द्यालयाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांच्या एकत्रित प्रयत्नांतून मिळालेले हे यश विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक गौरवास्पद पर्व ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button