
जळगाव, दि. ९ ऑगस्ट २०२६ : सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सामाजिक योगदानाची ओळख व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जयश्री पाटील यांनी केले. प्रा. निधी राजेंद्र शर्मा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रतिभा पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक पाटील उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे तसेच सामाजिक योगदानाचे महत्त्व विशद करण्यात आले.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना Google Form ची लिंक देण्यात आली असून, प्रश्नमंजुषेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षिका गीतांजली संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी-शिक्षिका साक्षी पाटील यांनी केले.
संस्थापक प्रा. डॉ. नारायण खडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. जयश्री शिंगाडे, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार, पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे तसेच द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
मान्यवर, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.






