ताज्या बातम्या

सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्था महाविद्यालय जळगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव : १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन सद्गुरु एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्था महाविद्यालय जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी सभापती स्थायी समिती जळगाव शहर महानगरपालिका डॉ. वर्षा खडके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

डॉ. वर्षा खडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत गायले. परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा खडके यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असून, देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. देशाची एकता, अखंडता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक सलोखा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

यावेळी त्यांनी युवकांनी शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यांना महत्त्व देऊन राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. संस्थापक प्रा डॉ नारायण खडके यांचे मार्गदर्शन लाभले सद्गुरु शिक्षण च्या सर्व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ प्रतिभा पाटील , डॉ.जयवंत शिंपी डॉ अनिता वानखेडे, प्रा राजेंद्र भालोदकर, डॉ तुळशीराम खडके,डॉ जयश्री पाटील, ,प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा, शिक्षकेतर कर्मचारी राजेश कुंभार, सुनील चौधरी,अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, शाम कोतवाल, अनिल राठोड,आणि व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button