
जळगाव, दि. २ ऑक्टोबर : सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील मॅडम होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता, साधेपणा आणि मानवतेच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर मनोगते व्यक्त करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले. सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. गांधीजींच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी दिलेला सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव आणि नैतिक मूल्यांची रुजवण करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास डॉ. अनिता वानखेडे मॅडम, डॉ. जयश्री पाटील मॅडम, प्रा. सुवर्ण अहिरे मॅडम, प्रा. निधी शर्मा मॅडम तसेच ग्रंथपाल श्री. पंकज वाघ सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






