जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

जळगाव – सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आज दिनांक 03 जानेवारी 2025 रोजी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅडम होत्या . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के सी ई सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथील डॉ. रंजना सोनवणे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ प्रतिभा पाटील यांनी . प्रास्तावीक मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कर्तुत्व आणि सामाजिक कार्य याविषयी सांगितले तसेच कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहील यावर प्रकाश टाकला. डॉक्टर रंजना सोनवणे यांनी सावित्रीबाई फुले यांचे महिला सक्षमीकरणातील योगदान, तसेच आजच्या स्त्रीच्या वास्तव जीवनाचा संदर्भ देऊन उदाहरणे दाखले दिले. आजच्या युगात जरी शप्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षम असली तरी कौटुंबिक बंधनात अडकलेली दिसून येते यासाठी स्त्रीवर्गाने आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवून कौटुंबिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. सक्षमीकरण आणि शिक्षण आणि सामाजिक भूमिका याविषयी मार्गदर्शन केले .त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दैंनदिन वास्तविक जीवनात स्त्रीने कसे वागावे, आत्मसन्मानाने कसे जगावे, स्वावलंबी जीवन जगताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे.या विषयी मार्गदर्शन केले.

व्दितीय वर्ष विद्यार्थी शिक्षिका अर्चना येवले हिने सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर माहिती सांगितली त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान थोडक्यात वर्णन केले. आभार प्रदर्शन डॉ.जयश्री पाटील यांनी केले . कार्यक्रम घेण्यासाठी प्रा डॉ नारायण खडके यांनी परवानगी व मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अनिता वानखेडे. डॉ प्रतिभा पाटील , डॉ अनिता जावे,डॉ जयश्री पाटील, प्रा . सुवर्णा अहिरे,प्रा. निधी शर्मा,प्रा जयश्री शिंगाडे, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे, आणि प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button