जळगावशैक्षणिक

नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग दहाव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि १५/०१/२०२५ बुधवार रोजी आयोजन करण्यात आलेले होते. या परीषदेत सुमारे ४० ते ५० संशोधक प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यात संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन विचार प्रवाह या विषयावर सखोल असे विवेचन उपस्थित संशोधकांनी केले. तसेच ४० संशोधकानी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.

या परीषदेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मोहन फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) यांनी केले या परिषदेसाठी मा. महेश फालक (चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) मा. श्री. विष्णू चौधरी (सेक्रेटरी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) मा. श्री. संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, कनिष्ट महाविद्यालय उपप्राचार्य प्रा योगेश एम. पाटील, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ गजेंद्र आर वाणी, डॉ गौरी एम पाटील आयोजन समिती सचिव प्रा. हर्षल व्ही पाटील, डॉ स्वाती फालक, प्रा पुनम महाजन तसेच प्रमुख वक्ते डॉ वंदना व्ही चौधरी (जी जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर) यांची उपस्थिती लाभली. ही परीषद एकूण तिन सत्रात संपन्न झाली. उदघाटन प्रसंगी सुत्रसंचालन प्रा. पुनम महाजन व प्रा. मेघा चौधरी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. हर्षल पाटील यांनी केले.

प्राथम सत्रात प्रा. डॉ वंदना व्ही चौधरी यांची बीजभाषण सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत झाले. आपल्या बीजभाषणात त्यांनी इमेज प्रोसोसींग फ्रॉम पिक्सेल टू इनसाइटस या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.

व्दितीय सत्र दुपारी १२.३० ते ४.०० या वेळेत संपन्न झाले असून त्यात संशोधकांनी शोधनिबंधाचे वाचन केले.

तिसरे व परीषदेचे समारोपाचे शेवटचे सत्र दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत संपन्न् झाले. त्यासाठी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपस्थीत होते. मान्यवरांनी सहभागी संशोधक प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांना प्रमाण पत्र वाटप केले.

या संपूर्ण परीषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ गजेंद्र आर वाणी, डॉ गौरी एम पाटील, आयोजन समिती सचिव प्रा. हर्षल व्ही पाटील, डॉ स्वाती फालक, प्रा पुनम महाजन व सर्व संगणक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक पीरश्रम घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button