जळगावशैक्षणिक

नाहाटा महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न 

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस व्ही पाटील, उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून गोल्ड अवर हॉस्पिटल भुसावळचे डॉ. सांतनू कुमार साहू, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी एच बऱ्हाटे, विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. डॉ. जी आर वाणी आदी उपस्थित होते .

डॉ. सांतनू कुमार साहू यांनी “आरोग्याची काळजी” या विषयावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आपल्या आरोग्याचा निसर्गाशी कसा संबंध आहे याबद्दल अतिशय सोप्या भाषेत अमूल्य मार्गदर्शन केले. आपल्या आरोग्याचा निसर्गाशी कसा संबंध आहे म्हणजे निसर्गातील विविध गोष्टींचा उपयोग करून आपण निरोगी राहू शकतो तसेच अचानक घरी आरोग्याबाबत काही त्रास जाणवू लागला तर घाबरून न जाता प्राथमिक उपचार कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ.जी. आर. वाणी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. डॉ. एस. डी. येवले, प्रा. डॉ. व्ही एन महिरे, प्रा. डॉ. एम. जे जाधव, प्रा. डॉ. सचिन कोलते, प्रा. डॉ. नीलिमा पाटील आणि संगणक शास्त्र व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button