

जळगाव – जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांतभाऊ नाईक यांची कन्या विधी व प्रतीक या नवदांपत्याचा विवाह सोहळा काल जळगाव येथील समस्त लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटात पार पडला. काल थोर समाजसुधारक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज व वधूचे आजोबा स्व. सुरेश मामा नाईक यांची देखील जयंती होती. या मंगल प्रसंगी नवदांपत्य प्रतीक व विधी यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा व स्व. सुरेश मामा नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांच्या विचारांचे स्मरण करून या नवविवाहित दांपत्याने आपल्या विवाह सोहळ्यातच गाडगे बाबा जयंती साजरी करून त्यांनी स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि विवेकवादाचा संदेश दिला. तसेच याप्रसंगी गाडगेबाबांच्या कीर्तनातील सामाजिक सुधारणा व शिक्षणाचे महत्त्व यावर चर्चा झाली.
संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते असे प्रतिपादन नववधू पिता माजी नगरसेवक प्रशांतभाऊ नाईक यांनी केले. विवाह सोहळ्यास मुंबई जी.एस.टी. विभागाचे उपायुक्त प्रशांत तुळशीराम पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल कपिलजी पवार, नाशिक वित्त आ.वि. विभागाचे सह आयुक्त कपिलजी जयकर पवार, पोलीस निरीक्षक सागर शिंपी, वरणगाव चे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे, दिपनगर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत बाळाजी वंजारी, अमित भाऊ भाटिया, लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ लाडवंजारी, जयवंतराव गामणे नाशिक यासह नाईक व वंजारी परिवारा कडील सर्व वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवदांपत्याच्या या निर्णयाचे कौतुक केले. समाजसुधारणेचा विचार पुढे नेत लग्नसमारंभात सामाजिक संदेश देण्याच्या या उपक्रमामुळे विवाह समारंभ एक प्रेरणादायी सोहळा ठरला.



