जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “बेटी लढेगी, बेटी बढेगी” उपक्रम

जळगाव – सध्या अनेक ठिकाणी मुलीं बाबतच्या छेडछाडीच्या घटना वाढू लागल्या असल्याने विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेची गरज निर्माण झाली आहे. हा दृष्टीकोन लक्षात ठेऊन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी अनोखा उपक्रम हाती घेत संत ज्ञानेश्वर विद्यालय मेहरुण मधील विद्यार्थिनींना रूपाली आव्हाड मॅडम व करिष्मा वंजारी मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली मोफत लाठीकाठी प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. आहे.एकीकडे सध्या युवती मोबाईलमध्ये गुंतून राहत असताना त्यांच्या हाती मोबाईल ऐवजी लाठी काठी देऊन युवतींना स्वसंरक्षणासाठी स्वतः पुढे येण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेल्या अनोख्या उपक्रमाचे शाळेतील पालकां मार्फत कौतुक होत आहे.मुलींना यांच्या या उपक्रमामुळे मुली नक्कीच धाडसी होतील . लाठी काठी प्रशिक्षणासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button