राज्यसामाजिक

माहिती आयुक्तांच्या जागा लवकरात लवकर भरा – सुभाष बसवेकर

पुणे :- माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य माहिती आयुक्त हे पद महत्त्वाचे असून गेल्या काही ३ वर्षांपासून यातील अनेक माहिती आयुक्त पद हे रिकामे असून दोन ठिकाणी एकच आयुक्त असल्याने द्वितीय अपीलांची संख्या वाढत असून सरकारने तात्काळ माहिती आयुक्तांची नेमणूक करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची पुणे जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक पुणे येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.

माहिती अधिकार याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, माहिती अधिकार कार्यकर्त्यांना येत असलेल्या अडचणी व समस्या , संघटनेचे ध्येय व धरणे याची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

“ले चले मशाली, लोग मेरे गाव के” या स्फूर्ती गीताने बैठकीची सर्वात करण्यात आली

यावेळी डॉ. परितोष झावरे यांनी

न्यायालयाचे दाखले देत

प्रत्येक नागरिकांना अधिकार सर्व सरकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे शिवाजी खेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर पुणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले , यावेळी आंबेगाव तालुक्यातील रमेश बोऱ्हाडे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी , माजी जिल्हाध्यक्ष राहुल बानगुडे यांची पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्कप्रमुख पदी तर राहुलकुमार अवचट यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली.

यावेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष रमेश बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष सुभाष बसवेकर व पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने माहिती अधिकार कायद्याचा प्रसार व प्रभावी वापर करण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले तर राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची तालुकास्तरीय बैठक घेण्यात येणार असून माहिती अधिकार कार्यकर्ता व सामान्य जनतेसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असून कार्यक्रमासाठी सुभाष बसवेकर, शिवाजी खेडकर, शेतकरी संघटनेचे गायकवाड, एस. एम जोशी संस्थेचे राहुल भोसले यांसह उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘ माहिती असायलाच हवी’ या चैनलचे सर्वेसर्वा राहुल कदम यांनी केले.

यावेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button