जळगावप्रशासकीय

राजुरा ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या चौकशी कामी समिती गठीत; पण चौकशीस मात्र टाळाटाळ

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींची चौकशी देखील सुरू आहे. यामध्ये अजून एका ग्रामपंचायतीची भर पडली ती म्हणजे राजुरा ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीत मे महिन्यात तत्कालीन ग्रामसेवक घोडके लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्या कार्यकाळापासून सन २०१९ ते २०२३-२४ पर्यंत एक  ते दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी राजुरा येथील काही सामजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये आशाबाई नथ्थु भोलाणकर, ग्रामपंचायत सदस्य श्रावण काशिनाथ धाडे, माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशनचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय संतोष कांडेलकर, पंकज रामधन रोठे यांनी दि ३१ जानेवारी २०२५ ला पंचायत समिती मुक्ताईनगर येथे तक्रारी केलेल्या आहेत. सदर तक्रारींची दखल घेत पंचायत समिती गट विकास अधिकारी निशा जाधव यांनी दि.१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश बी सपकाळे, ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी युवराज अढागळे, बांधकामची शाखा अभियंता शकृद्दिन तडवी,  कनिष्ठ लेखा अधिकारी सुनील बी कोठावदे यांची समिती गठित केली असून अशी प्रत तक्रारदारांना दिलेली आहे. चौकशी समिती मार्फत सत्यता पडताळून कारवाई होणार याकडे तक्रारदारांसह तालुक्यातील नागरिकांचे लक्ष्य लागून आहे.

चौकशी समितीचे पदाधिकारी ५ मार्च २०२५ रोजी राजुरा येथे तपासासाठी येणार होते. मात्र तीन आठवडे उलटूनही चौकशी समिती चौकशीसाठी राजुरा येथे आलेली नाही. या संदर्भात विचारणा केली असता संबंधितांकडून उडवा उडविची उत्तरे देण्यात येत आहे.

समिती सदस्यांच्या प्रतिक्रिया

निशा जाधव, गट विकास अधिकारी पंचायत समिती, मुक्ताईनगर – मुक्ताईनगर पंचायत समितीला खूप कामे आहे कामे असल्या कारणाने आले नाही मात्र दोन तीन दिवसात येणार आहे.

रमेश सपकाळे सहाय्यक गटविकास अधिकारी – ला काम होते त्यामुळे येवू शकलो नाही मी चौकशी सदस्य यांना सांगितले तुम्ही चौकशी करा मात्र त्यांना गाडी नसल्याने सदस्य आले नाही.

युवराज अढागळे, विस्तार अधिकारी – आमची आढावा बैठक असल्याने येणे शक्य झाले नाही पुढील तारीख ठरवू

 तक्रारदार संजय कांडेलकर यांची प्रतिक्रिया

विस्तार अधिकारी युवराज अढागळे यांना संपर्क केला असता गाडी नसल्याने आम्ही येवू शकत नाही गाडीची व्यवस्था करून द्या. तर चौकशीकामी येऊ अशी मागणी करण्यात आली. गटविकास अधिकारी निशा जाधव यांना भ्रमणध्वणीवरून संपर्क केला असता समिती येणार आहे माझी गाडी घेवून जा असे सांगितले. मात्र चौकशी समिती चौकशीकामी करत असलेले टाळाटाळ बघता याप्रकरणी काही राजकीय दबाव तर नाही ना अशी शंका येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button