जळगावशैक्षणिक

सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” उत्साहात साजरा 

जळगाव – सद्गुरू एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे 12 ऑगस्ट रोजी “राष्ट्रीय ग्रंथपाल दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ,अनिता वानखेडे मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ,जयवंत शिंपी सर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तसेच दीप प्रज्वलन व उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्राध्यापक,यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री पंकज वाघ सर यांनी , 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून का साजरा केला जातो याबद्दल त्यांनी माहिती दिली,  त्यात त्यांनी डॉ,रंगनाथन यांच्या जीवन कार्याबद्दल, त्यांचा जन्म शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण,पुढे ग्रंथालय शास्त्रातील त्यांची रुची, भारतीय ग्रंथालय विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान, ग्रंथालय शास्त्रातील इतिहास, सार्वजनिक ग्रंथालय,शालेय-महाविद्यालय ग्रंथालय, विद्यापीठ आणि विशेष संशोधन ग्रंथालय, या सर्व ग्रंथालयाच्या उभारणीमध्ये डॉक्टर रंगनाथन यांचा असणारा सिंहाचा वाटा, डॉ, रंगनाथन यांचे 2500 हजाराहून अधिक लेख 65 हुन अधिक पुस्तकांचे लेखन, याची ही माहिती दिली, तसेच ग्रंथालय शास्त्रातील प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी,पीएचडी यासारख्या कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांचे योगदान, ग्रंथालयातील पुस्तकांचे वर्गीकरण, तालिकाकरण,ग्रंथालय व्यवस्थापन, संघटन प्रशासन, ग्रंथालयातील महत्त्वाचे पाच सूत्र यामध्ये केलेले कार्य, आणि डॉ, रंगनाथन यांच्या भारतीय ग्रंथालय स्थापनेमध्ये केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, अमेरिकन विद्यापीठाकडून डि,लीट. ही पदवी, तसेच अमेरिकन लायब्ररी असोशियन तर्फे “मार्गरेट मॅन” हा अवॉर्ड देऊन, डॉक्टर रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.  त्यांच्या या महान कार्याबद्दल भारतातच नव्हे तर जगात आपल्या कर्तुत्वाने देशाचे नावलौकिक उंचावणारे देशातील ग्रंथालय शास्त्राच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, ग्रंथालय शास्त्रातील पितामह, पद्मश्री, डॉ, शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती संपूर्ण देशात हा “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” म्हणून साजरा केला जातो, अशी सर्व त्यांच्या जीवन कार्याबद्दल सखोल माहिती ग्रंथपाल श्री पंकज वाघ सर यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ, जयश्री पाटील मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.प्रतिभा पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, संस्थेचे चेअरमन डॉ,नारायण खडके, प्राचार्य डॉ,अनिता वानखेडे, ग्रंथपाल श्री पंकज वाघ, तसेच डॉ,प्रतिभा पाटील, डॉ, जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा.निधी शर्मा, श्री अरविंद पवार, श्री चंद्रकांत सपकाळे, व द्वितीय वर्ष बीएड विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. पुढे अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button