जळगावराजकारण

आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक; भाजपच्या आंदोलनाचा निषेध

नाथाभाऊंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर रूपाली चाकणकर यांच्या संदर्भात केलेल्या कथित वक्तव्याचा खोटा कांगावा करून जळगाव भाजपकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दि. 8 ऑगस्ट रोजी खडसे यांच्या प्रतिमेला शाही व काळे फासण्यात आले, हा प्रकार अत्यंत केविलवाणा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी म्हटले आहे.

या आंदोलनाच्या निषेधार्थ व नाथाभाऊंच्या समर्थनार्थ दि. 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जोरदार घोषणाबाजी करत एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. “नाथाभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ में हैं” कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, युवक शहराध्यक्ष रिकू चौधरी, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, सुनील माळी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, राजू मोरे, डॉ. रिझवान खाटीक, इब्राहिम तडवी, प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, कलाबाई शिरसाठ, संजय पाटील, आशिफ शेख, आकाश हिवाळे, चेतन पवार, संजय जाधव, सुहास चौधरी, अमजद खाटीक, इम्रान खान, फारुक शेख, कैलास पाटील, रफिक पटेल, भल्ला तडवी, गणेश पाटील, प्रभाकर माळी, अविनाश माहिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button