जळगावसामाजिक

रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शाडू माती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर उत्साहात

जळगाव : “माझा बाप्पा, माझ्या हाताने तोही पर्यावरणपूरक” या भावनेला उजाळा देणारा उपक्रम रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित शासनमान्य ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला. बीजयुक्त पर्यावरणपूरक बाप्पा शाडू माती गणेशमूर्ती बनविण्याचे विनामूल्य प्रशिक्षण शिबिर दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या संपन्न झाले.

या शिबिराचे मार्गदर्शन प्रशिक्षक डॉ. सविता नंदनवार व डॉ. अनिता पाटील यांनी केले. त्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारताना मूर्तीमागील कलात्मकता, पर्यावरणपूरकतेचे महत्त्व आणि घराघरात गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाशी सुसंगत राहण्याचा संदेश दिला. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी मूर्ती बनवून आनंदाचा अनुभव घेतला. तसेच बाप्पाच्या प्रत्येक मोदकात विविध विविध बियाणे घातले आहेत जेणे करून बीज अंकुरित होऊन तेथे एक वृक्ष निर्माण होईल

या उपक्रमाला पीपल बँकेचे चीफ मॅनेजर शुभश्री दप्तरी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हर्षाली चौधरी, अनिता बाफना, आयुषी बाफना, ऐश्वर्या बाफना, महेंद्र पाटील, ज्योती रोटे, जयश्री पटेल आदींनी परिश्रम घेतले.

शिबिरात ‘उडान’ केंद्रातील ४० दिव्यांग विद्यार्थी, हरिजन कन्या छात्रालयातील ४० विद्यार्थिनी व विविध शाळांमधील ३० विद्यार्थी अशा एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी छात्रालयाच्या अधीक्षिका प्रतिभा मोगरे व हर्षदा गुरव उपस्थित होत्या. सदरचे शिबिर ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मनपा शाळा क्र. ५, पोलीस मुख्यालय आवार, जळगाव येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या शेवटी रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. हर्षाली चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानून समाजहितासाठी असे उपक्रम सतत राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button