जळगावसामाजिक

राहूल सोलापूरकर यास अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या बाबत बदनामी कारक बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी याबाबतचे निवेदन जळगावचे जिल्हाधिकारी यांना आज दि.१० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने सादर करण्यात आले.

राहुल सोलापूरकर नामक तथाकथित अभिनेत्याने विश्वभूषण असणाऱ्या कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संदर्भात बदनामीकारक, बेताल, संदर्भहीन वक्तव्य करून महाराष्ट्रातील समस्त छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या भावनांना ठेच पोहोचवली असून या त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सोलापूरकर यांनी या महापुरुषांचे कार्य कर्तुत्वाला व बुद्धिमत्तेला कमी लेखून त्यांचा अवमान आणि अपमान केलेला आहे. सोलापूरकर इतिहासाचे अभ्यासक नसून संशोधक देखील नाहीत त्यांनी संदर्भ हीन विधाने करून बहुजन समाजाची दिशाभूल केली आहे. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल बेताल वक्तव्य करताना कोणताही संदर्भाचा दाखला न देताना छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आपली आग्र्यावरून सुटका करून घेतली, अशा पद्धतीचे अत्यंत हीन वक्तव्य करून शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा आणि पराक्रमी इतिहासाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या पदव्या म्हणजेच त्यांनी केलेलं वेदाचे अध्ययन आहे, असे खोटे वक्तव्य करून बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे ते ब्राह्मणच ठरतात, अशा पद्धतीचे अवमानकारक विधान करून संपूर्ण शिवप्रेमी व भीम अनुयायांचा जाणीवपूर्वक अपमान करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शब्दांचा व भावनांचा गांभीर्याने विचार करून राहुल सोलापूरकर नामक अभिनेत्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जिल्हाधिकारी महोदयांना दिले. यावेळी जयसिंग वाघ,प्रा. डॉ. सत्यजित साळवे विश्वास बि-हाडे, भारत सोनवणे, बापूराव पानपाटील, रमेश सोनवणे, राजू मोरे, महेंद्र केदारे,सोमा भालेराव, अजय बि-हाडे, मनोहर लोखंडे, जगदीश सपकाळे ,भाऊराव इंगळे, मनोहर गाडे, विवेक सैंदाणे, दिलीप सपकाळे, पितांबर अहिरे ,विजय सुरवाडे ,श्रीकांत बाविस्कर, शिरीष‌ अडकमोल ,सुभाष सोनवणे , वाल्मीक जाधव असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button