जळगावसामाजिक

नाथाभाऊंच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जळगाव, दि. २ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या अमृतमहोत्सवी  ७५व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, जळगाव महानगरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या आयोजनातून झालेल्या या उपक्रमात विद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाऊ पठाण होते.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनीलभाऊ माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, ओबीसी महानगराध्यक्ष गिरीश सांगळे, श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष बाळाजी सानप, भगवान लाडवंजारी, संस्थेचे संचालक संतोषभाऊ चाटे, मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केली. अध्यक्षीय भाषणात मजहरभाऊ पठाण यांनी आमदार एकनाथरावजी खडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या पुढाकारातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. वाढदिवसानिमित्त शासकीय महाविद्यालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच शिवाजीनगर परिसरातील खडके जाळजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष विनायक पाटील यांच्या आयोजनातून मेडिकल कॅम्प घेण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा पाटील व दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button