जळगावक्राईम

जळगाव तालुका पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघड

जळगाव, दि. 11 जून : जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करत जळगाव तालुका पोलिसांनी तत्परता आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडविले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, CCTNS गु.र.नं. 178/2026 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 11 जून 2026 रोजी साई गार्डन हॉटेल परिसरात फिर्यादी व साक्षीदारांना धमकावून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली होती. तसेच आरोपींनी जबरदस्तीने ₹7,800/- रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना घडली होती.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अल्पावधीतच आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले.

या गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

चेतन उर्फ बट्या रमेश सुरेश (वय 21 वर्षे)

गोरख संजय जाधव (वय 21 वर्षे)

रोशन भगवान पाटील (वय 26 वर्षे)

अभिजीत दत्तात्रय आवटे (वय 24 वर्षे)

जळगाव तालुका पोलिसांच्या जलद, प्रभावी आणि समन्वयपूर्ण तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव तालुका पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button