जळगावशैक्षणिक

रोटरी क्लब जळगावतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण; तिरंगा रॅलीत ‘अल्फा पिढी’ची कर्तव्यनिष्ठेला अनोखी सलामी!

तुकाराम मुंडेंच्या कर्तव्यनिष्ठेचा विद्यार्थ्यांनी घेतला आदर्श; “मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही, माझ्या क्षेत्रात त्यांच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचं आहे”चा प्रेरणादायी संदेश

मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष सचिन मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक व मुख्याध्यापक मुकेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित तिरंगा रॅलीत ‘अल्फा पिढी’तील विद्यार्थ्यांनी तुकाराम मुंडे यांचे पोस्टर हातात घेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला अनोख्या पद्धतीने सलामी दिली. “मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही; मला माझ्या क्षेत्रात तुकाराम मुंडेंसारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचं आहे,” हा विद्यार्थ्यांचा संदेश विशेष आकर्षण ठरला.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा, संगीत व कवायतीचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातातील राष्ट्रध्वज, घोषवाक्ये आणि देशप्रेमाचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कोळी यांनी प्रभावीपणे केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मराठे, सचिव जितेंद्रलाल, दिलीप डिंगरे, रवी कटारिया, प्रयोग बेहडे, अरविंद पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन जेठवाणी, जयदीप सर, भागवत सानप, एकनाथ वंजारी, अर्चना नाईक आणि डॉ. कोमल पाटील यांच्यासह शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने काम करण्याचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button