

*श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये मतदान जनजागृती*
जळगावा- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर होते.
शितल कोळी मॅडम यांनी मतदान हे राष्ट्रहितासाठी श्रेष्ठदान कसे आहे हे पटवून दिले. त्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले आई-वडील, आपले मोठे दादा, दीदी, आपल्या गल्लीतील काका, काकू, मावशी तसेच शेजारी यांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यास आग्रह करण्याचे मार्गदर्शन केले. गावातील ग्रामस्थांना मतदान जनजागृती करण्यात आली. मतदान जन जागृती साठी शाळेमध्ये भव्य रांगोळी काढण्यात आली होती.



