जळगावसामाजिक

कचरा निर्मूलन व विलगीकरण चर्चासत्राचे आयोजन

जळगाव – आरोग्य भारती जळगाव आणि हौसिंग सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोझ गार्डन येथे कचरा निर्मूलन आणि कचरा विलगीकरण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर चर्चासत्रासाठी डॉ. महेश काबरा व डॉ सुनील सूर्यवंशी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. हौसिंग सोसायटीमधील 50 पेक्षा अधिक नागरिक देखील यावेळी उपस्थित होते. कचऱ्याचे विलगीकरण कोणत्या पद्धतीने केले जाते आणि कचरा विकला जाऊ शकतो या विषयावर डॉ महेंद्र काबरा यांनी मार्गदर्शन केले तर कचऱ्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरून बऱ्याच कुटुंबांवर आर्थिक भार वाढतो, म्हणूनच कचऱ्यामुळे होणाऱ्या इन्फेक्शन होऊन आजारी पडायचे नसेल तर आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे असे डॉ सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले. कचरा निर्मूलन आणि कचऱ्याचे विलगीकरण हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन प्रकाश पाटिल यांनी दिले. यावेळी हाउसिंग सोसायटी सुमारे 50 – 60 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ लीना पाटील यांनी केले.

हौसिंग सोसायटीतच असलेले अमर टी सेंटर यांनी सतत 10 वर्षांत त्यांचे दुकान टापटीप ठेऊन उत्तम सेवा दिली व परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच नुकत्याच संभाजीनगर येथे पार पडलेल्या योग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालेल्या शरयु विसपुते यांचे अभिनंदन व सत्कार सोसायटीमार्फत करण्यात आला. वर्षभरात असे चांगले उपक्रम राबवण्याचे आश्वासन सोसायटीचे चेअरमन डॉ राजू पाटील यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button