
जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात श्रमदान केले. विद्यार्थ्यांनी आदित्य हॉटेल चौकातील आवारातील विद्यार्थ्यांनी केलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाच्या बाजूला पावसाळ्यामुळे तन गवत वाढले होते .कार्यानुभव शिक्षक उज्वला नन्नवरे यांच्या संकल्पनेतून शालेय मुख्यमंत्री लोकेश महाजन म्हणून निवड झालेला विद्यार्थी यांच्या माध्यमातून परिसरामध्ये सहावी व सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत श्रमदान केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना कार्यानुभव म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामातून मिळवलेला अनुभव असतो. यामुळे कामाच्या ठिकाणी काम करताना विविध कौशल्ये शिकता येतात, जसे की टीमवर्क, समस्या सोडवणे, संवाद कौशल्ये इत्यादी. असे सांगितले. कार्यक्रमाला शालेय मुख्यमंत्री लोकेश महाजन ,उपमुख्यमंत्री रोहन मौर्य यांची उपस्थिती होती.






