जळगावशैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संत ज्ञानेश्वर विद्यालयात विनम्र अभिवादन

जळगाव – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांचा आदर्श उराशी ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये मोठे व्हावे असे आवाहन केले. यावेळी प्रारंभी संविधान पत्रिकेचे वाचन उपशिक्षिका उज्वला नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button