जळगावशैक्षणिक

सद्गुरु एज्युकेशन सोसायटी राष्ट्रिय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

जळगाव, दि. १२ ऑगस्ट २०२६ : सद्गुरु एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयवंत शिंपी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. पंकज वाघ यांनी १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून का साजरा केला जातो, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना भारतीय ग्रंथालयशास्त्राच्या विकासातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती दिली. सार्वजनिक ग्रंथालये, शालेय व महाविद्यालयीन ग्रंथालये तसेच विविध संशोधन ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

ग्रंथालयशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उंचावणाऱ्या डॉ. रंगनाथन यांच्या कार्यामुळे भारतातील ग्रंथालय चळवळीला नवी दिशा मिळाली, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अरविंद पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. जयवंत शिंपी, प्रा. राजेंद्र भालोदकर, प्रा. निधी शर्मा, प्रा. सुवर्णा अहिरे, ग्रंथपाल पंकज वाघ, श्री. अरविंद पवार, श्री. चंद्रकांत सपकाळे तसेच बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. नारायण खडके यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button