

जळगाव – विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शासन परिपत्रकांच्या आधारे गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग नागरिकांना घरकुल, व्यवसायासाठी जागा, शासकीय घरकुल योजनांचा लाभ, महिलांना स्वतंत्र जागा, लाईटबील माफ करणे अशा विविध प्रकारच्या मागण्या महानगरपालिकेकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आलेल्या आहेत. तरीदेखील महानगरपालिकेने याप्रकरणी काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे विश्वरत्न अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली २५ एप्रिल २०२५ रोजी दिव्यांग बांधवांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान पासून जळगाव शहर महानगरपालिके वर निघणार आहे. संपूर्ण जळगाव शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याचे अशोक बाविस्कर यांनी कळवले आहे.




