जळगावसामाजिक

“सर्वच पुराणात गोसेवेला ईश्वरीय महत्व असून चौदा पिढींचा उद्धार करणारी गोकथा दुर्लभ आहे”- साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी

जळगाव – शहरातील पांजरापोळ गोशाळेत दिनांक ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान श्री पांजरापोळ संस्था सर्व पदाधिकारी सदस्य गण,जळगाव माहेश्वरी महिला मंडळाच्या सहयोगाने भव्य सुंदर, संगीतमय गौकथेला आज पासून दुपारी ०३ ते ०६ यावेळेत पाच दिवसीय विशेष पावन भक्तिमय कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.

आज सर्व प्रथम गौकथा कार्यक्रमाला गोपुजा,कलश पूजन लक्ष्मीनारायण मणियार यांनी सपत्नीक करून केली. यावेळी असंख्यभक्त उपस्थित होते,यावेळी पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी यांनी सर्वच पुराणात गोसेवेला ईश्वरीय महत्व असून चौदा पिढींचा उद्धार करणारी गोकथा दुर्लभ असल्याचे सांगून अनेक जटिल व्याधी,उपाधी दूर करण्याचे सामर्थ्यही गोसेवेत असून गोमातेत साक्षात देव वास असल्याने कलियुगात गोसेवा प्रत्यक्ष नारायण सेवा आहे.गोवंश सशक्तीकरण व पर्यावरण संतुलनासाठी प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशव्या वापर केला जावा असेही त्यांनी सांगितले.

जळगावातच प्राथमिक शिक्षण आर.आर शाळेत तर संगणकात बी टेक बांभोरी इंजिनीरिंग कॉलेज येथे पूज्य साध्वींचे झाले असून मोठ्या पगाराची नोकरीआणि संसार सोडून त्यांनी गोसेवेला प्राधान्य देत संत सेवेला सुरवात केली आज देशभरात चारशे पेक्षा अधिक कथा तर हजारो गायींच्या व्याधीमुक्ती करिता वैद्यकीय सेवा त्या करीत असून त्यांनी आज गोकथेत पुराणांचा दाखला, संदर्भ देत गोसेवा किती पुण्यदायी आहे याबाबत महत्व विषद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button