जळगावशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या इको क्लब तर्फे जळगाव‎ क्लायमेट‎ वॉरियरांकडुन पुस्तकांना कागदी कव्हर व स्टील डबा व पाण्याची बॉटल

जळगाव – जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी जळगाव महानगरपालिका, योगी ( युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जळगाव क्लायमेट वॉरियर्स’ या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आव्हानाला प्रतिसाद देत शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेमध्ये कागदी कव्हर लावणे स्टील डबा, स्टील पाणी बॉटल बंधनकारक केलेली आहे.

उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळांमध्ये पर्यावरण-जागरूकता वाढवणे व प्लास्टिक वापर टाळण्यासाठी उपायांची अंमलबजावणी करणे हा आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील शाळांमध्ये प्लास्टिक टिफिन डब्यांवर, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर आणि पुस्तकांवर प्लास्टिकचे कव्हर लावण्यावर शाळेच्या माध्यमातून बंद करून स्टील टिफीन, बॉटल आणि पेपर कव्हर आदी प्रोत्साहन देऊन शाळांना प्लास्टिकमुक्त करणे आहे.

संशोधनानुसार प्रत्येक विद्यार्थी रोजच्या जगण्यात टिफीन आणि बॉटल मार्गे मायक्रोप्लास्टिक शरीरात शिरत आहे.हे सूक्ष्म कण मानवी शरीरावर अपायकारक परिणाम करत असून कॅन्सर, मुलींच्या पाळीच्या समस्या, लहान मुलांमधील लठ्ठपणा, हार्मोन्स मधील बिघाड आदी गोष्टी घडत आहेत.

या उपक्रमाद्वारे, विद्यार्थ्यांमधून सुरू होणारा प्लास्टिक टाळण्याचा बदल त्यांच्या कुटुंबात व समाजात पसरून संपूर्ण शहराची जीवनशैली पर्यावरणपूरक करण्यास मदत करेल असे मुख्याध्यापक मुकेश नाईक आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button